Skip to content

आदिशक्ती अभियान

महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाचा राज्यव्यापी उपक्रम

महिलांना सुरक्षित, सक्षम आणि माहितीपूर्ण बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एकत्रित प्रयत्न. योजना, GR, समित्या, प्रशिक्षण, जिल्हानिहाय अपडेट्स आणि मार्गदर्शन — सर्व काही इथे उपलब्ध. सोप्या, स्पष्ट आणि विश्वासू भाषेत.

✨ महिला हेल्पलाइन – 14490 ✨

तुमच्या सुरक्षिततेसाठी नेहमी तयार!

Maharashtra Adi Shakti Abhiyan : अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट

  • महिलांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण, आर्थिक, सामाजिक आणि नेतृत्ववृद्धीस चालना देणे.
  • बालमृत्यू, मातामृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करणे.
  • पंचायतराज व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवणे.
  • किशोरवयीन मुली, अल्पवयीन मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविणे.
  • कौटुंबिक हिंसाचार व बालविवाहास प्रतिबंध करणे.

🏆 Maharashtra Adi Shakti Award : आदिशक्ती पुरस्कार

या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी ग्राम, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विशेष समित्या स्थापन केल्या जातील. या समित्यांचे वार्षिक मूल्यमापन करण्यात येणार असून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समित्यांना ‘आदिशक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.

हे पुरस्कार ग्रामपंचायत स्तरावर दिले जातील आणि सर्व पंचायत समित्यांना अभियानात सक्रिय सहभाग आवश्यक असेल.

समित्यांची जबाबदारी

  • महिलांविषयक शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करणे.
  • अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण टाळण्यासाठी दक्षता घेणे.
  • कौटुंबिक अन्यायग्रस्त महिलांसाठी न्यायप्रक्रिया सुलभ करणे.
  • किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन व मार्गदर्शन करणे.

महिला मदत व जनहितार्थ हेल्पलाईन माहिती

📞 14490 वर कशासाठी कॉल करू शकतात?

या नंबरवर महिलांना खालील बाबींमध्ये मदत मिळते:

  • घरगुती हिंसा (Domestic Violence)
  • छेडछाड / अत्याचार
  • सायबर छळ
  • कायदेशीर मार्गदर्शन
  • समुपदेशन (Counselling)
  • तातडीची मदत आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क

📢 जनहितार्थ सूचना

महत्वाचे हेल्पलाईन नंबर – आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर ग्रामस्थांच्या माहितीसाठी कळविण्यात येते की, शासनाने नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी खालील हेल्पलाईन सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.

🚭 14499 – तंबाखू मुक्ती हेल्पलाईन

तंबाखू / गुटखा / सिगारेट सोडण्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशन.

👩‍🦰 14490 – महिलांसाठी मदत हेल्पलाईन

महिलांवरील अत्याचार, छळ किंवा अन्य अडचणीसाठी त्वरित मदत.

या सेवांचा गरज पडल्यास जरूर उपयोग करावा व इतरांनाही माहिती द्यावी.

🙏 आपले आरोग्य व सुरक्षितता – आपली जबाबदारी


मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान :

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हा महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे, ज्यामध्ये कामगिरीनुसार प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे हे उद्दिष्ट आहे. या अभियानांतर्गत, ग्रामपंचायतींना सुशासन, सक्षम पंचायत, जलसमृद्धी आणि हरित आणि स्वच्छतेसारख्या सात घटकांवर आधारित कामगिरीसाठी पुरस्कार दिले जातात. 

ग्रामपंचायत उटी (बु.) गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रामस्तरीय समिती पुढील प्रमाणे स्थापना केली आहे.

ग्रामपंचायत उटी (बु.) गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रामस्तरीय समिती पुढील प्रमाणे स्थापना केली आहे.
अ.क्र. नाव (पदाधिकारी/सदस्य) सध्याचे पद पद
1वैशाली लक्ष्मण कांबळेसरपंच / प्रशासकअध्यक्ष
2रफिक बाबुमिया शेखउपसरपंचसदस्य
3भागवत मारूती लोंढेग्रा.पं. सदस्य / पदाधिकारीसदस्य
4बळीराम हरिश्चंद्र शिंदेग्रा.पं. सदस्य / पदाधिकारीसदस्य
5बिभीषण रामा कांबळेग्रा.पं. सदस्य / पदाधिकारीसदस्य
6अनुसया रामदास भोजनेग्रा.पं. सदस्य / पदाधिकारीसदस्य
7माधुरी चंद्रकांत भोकरेग्रा.पं. सदस्य / पदाधिकारीसदस्य
8मोनिका अशोक अंधारेग्रा.पं. सदस्य / पदाधिकारीसदस्य
9सारिका देविदास कांबळेग्रा.पं. सदस्य / पदाधिकारीसदस्य
10प्रयाग तानाजी कांबळेग्रा.पं. सदस्य / पदाधिकारीसदस्य
11रिहाना मेहतांब शेखआशा स्वयंसेविकासदस्य
12मीना जनार्दन कांबळेअंगणवाडी सेविकासदस्य
13अंकल अंधारेपोलीस पाटीलसदस्य
14भारती सरमुख्याध्यापकसदस्य
15सतीश राठोडग्राम महसूल अधिकारीसदस्य
16वाडकर राधेश्याम गुरूनाथसहाय्यक कृषि अधिकारी (कृषि सहाय्यक)सदस्य
17अर्चना गायकवाडवैद्यकीय अधिकारी / आरोग्य सेवकसदस्य
18महेश भरत जगतापग्रामपंचायत अधिकारीसदस्य सचिव

माझी वसुंधरा अभियान ५.०

माझी वसुंधरा अभियान ५.० ‘ हा महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या अंतर्गत सुरू असलेला एक उपक्रम आहे, जो राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (अमृत शहरे, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत) राबवला जात आहे. या अभियानाचा उद्देश पंचमहाभूतांवर (भूमी, जल, वायु, अग्नि, आकाश) लक्ष केंद्रित करून पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि वातावरणीय बदल कमी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवणे आहे.

अभियानाची प्रमुख उद्दिष्ट्ये:

  • नागरिकांचा सहभाग: वातावरणीय बदल कमी करण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये नागरिकांना सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे. 
  • शाश्वत उपाय: पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपाययोजना करणे. 
  • पंचमहाभूत: भूमी, जल, वायु, अग्नि आणि आकाश या पंचमहाभूतांच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करणे.