ग्रामपंचायत उटी (बु.) गावाने विविध सरकारी योजनांअंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेक सन्मान चिन्हे आणि पुरस्कार मिळाले आहेत..
ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणीय उपक्रमांद्वारे अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. या पुरस्कारांमुळे गावाची ओळख एक प्रगतशील, सुशिक्षित आणि पर्यावरणपूरक गाव म्हणून झाली आहे

अभिमानास्पद यश! हार्दिक अभिनंदन!
या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत उटीला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हे यश म्हणजे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या एकजुटीच्या, मेहनतीच्या व विकासाभिमुख कार्याचा गौरव आहे.
अभिमानास्पद यश!
ग्रामपंचायत उटीचा महाराष्ट्रात डंका!
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान!
उटीच्या शिरपेचात मानाचा तुरा! 🌟
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत ग्रामपंचायत उटी बु. यांनी संपूर्ण राज्यात विभागून तृतीय क्रमांक पटकावत ₹१ कोटींचे पारितोषिक मिळवले आहे. हे यश ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि समस्त ग्रामस्थांच्या एकजुटीचे, मेहनतीचे व लोकसहभागाचे प्रतीक आहे.
वृत्तपत्रांमध्ये उटीच्या यशाची दखल
पुरस्कार सोहळ्याची छायाचित्रे
समस्त उटी ग्रामस्थांचे हार्दिक अभिनंदन!
या ऐतिहासिक यशासाठी योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या एकजुटीने आणि लोकसहभागातून उटीने महाराष्ट्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
गावाचा विकास, गावाचा अभिमान! 🚩







