
उटी बु. ग्रामपंचायत !
पुरस्कारांनी सन्मानित, स्वच्छतेने प्रेरित, पर्यावरणाने सजलेले, शिक्षणाने समृद्ध आणि विकासाने उजळलेले गाव.

श्री. देवेंद्र फडणवीस
श्री. एकनाथ शिंदे
श्रीमती सुनेत्रा अजित पवार
श्री. जयकुमार गोरे
श्री. योगेश कदम
डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.)
डॉ. भारत बास्टेवाड (भा.प्र.से)
श्री. राहुल कुमार मीना (भा.प्र.से)
श्री. असलम तडवी
श्री. बाळासाहेब वाघ
श्री.आनंदकुमार मिरगणे
सौ.वैशालीताई लक्ष्मण कांबळे
रफिक शेख
श्री महेश भरत जगताप
औसा तालुक्यातील उटी (बु.) गावातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी पृथ्वीक प्रताप आणि शिवाली परब यांनी भेट दिली.
ग्रामपंचायतीच्या स्मार्ट व्हिलेज उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. विशेषतः महिलांच्या सन्मानासाठी केलेल्या कार्याचेही गौरव करण्यात आले.
🙏 सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार!
ग्रामपंचायत उटी (बु.), ता. औसा, जि. लातूर
विकासाची लोकचळवळ… समृद्धीची नवी दिशा!
उटी बु. ग्रामपंचायत च्या डिजिटल पोर्टल वर आपले स्वागत आहे!
उटी (बु.) हे गाव जिल्हा मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर आहे आणि तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर आहे. हे गाव २४४ लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ व लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. हे गाव भादा जिल्हा परिषद गट व भादा पंचायत समिती गणांत समाविष्ट आहे. गावचे ग्रामदैवत जगदंबा देवी असून त्यास तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या २०५४ आहे. गावात विविध जाती-धर्माचे लोक राहतात, तसेच त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती असून जोडधंद्यांमध्ये हॉटेल, जनरल स्टोअर्स, मंडप डेकोरेशन, किराणा दुकान, न्हावी दुकान, सुतार, लोहार, दुग्ध व्यवसाय व मजुरी यांसारखे व्यवसाय प्रामुख्याने केले जातात.
गावाच्या बाजूने वाहणाऱ्या तावरजा नदीवर मध्यम प्रकल्प उभारल्यामुळे सदर गावाचे पूर्ववसन करण्यात आले आहे. या प्रकल्पातून शेतीसाठी व उटी (बु.), लखणगाव, आलमला, शिऊर इत्यादी गावे तसेच औसा नगर परिषदेसाठी पाणीपुरवठा केला जातो.
ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत भव्य असून गावातील सर्व नागरिकांना वेळेवर सुविधा पुरवल्या जातात. ग्रामपंचायतमार्फत सर्व प्रकारचे दाखले संगणकीकृत पद्धतीने दिले जातात.
गावाला सन २०१७-१८ च्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत पाणी व्यवस्थापन या विषयाकरिता स्व. वसंतराव नाईक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
तसेच सन २०१७-१८ च्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत तालुकास्तरावरील प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे दैनिक लोकमत तर्फे सन २०१७-१८ मधील जलव्यवस्थापनासाठी देण्यात आलेला लोकमत सरपंच अवॉर्ड ग्रामपंचायतीस प्राप्त झाला आहे


QR द्वारे ऑनलाईन तक्रार व अभिप्राय
नागरिकांसाठी तक्रारी व अभिप्राय ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपल्या समस्येची माहिती देऊन ग्रामपंचायतीस सहकार्य करा
🌐 ग्रामपंचायत वेबसाइट शेअर करा
आमची अधिकृत ग्रामपंचायत वेबसाइट नागरिक, मित्र व नातेवाईकांसोबत शेअर करा. पारदर्शक प्रशासन व गावाच्या विकासासाठी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.
🔗 वेबसाइट शेअर करा
QR कोड स्कॅन करा व कर भरा
घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
जलद, सुरक्षित व सोपी ऑनलाइन सेवा.
🌟 उल्लेखनीय काम 🌟
🏅 ग्रामपंचायतीने प्राप्त केलेले पुरस्कार 🏅

सौ. वैशालीताई लक्ष्मण कांबळे
सरपंच

रफिक शेख
उपसरपंच

श्री महेश भरत जगताप
ग्रामपंचायत अधिकारी
| अ.क्र | ग्रा.पं. सदस्याचे नाव | पद | मोबाईल क्रमांक |
|---|---|---|---|
| 1 | वैशाली लक्ष्मण कांबळे | सरपंच | 8975268881 |
| 2 | रफिक बाबुमिया शेख | उपसरपंच | 9921401269 |
| 3 | बळीराम हरिश्चंद्र शिंदे | सदस्य | 9850439229 |
| 4 | लोंढे भागवत मारूती | सदस्य | 9881092714 |
| 5 | सारिका देविदास कांबळे | सदस्य | 8605531033 |
| 6 | बिभीषण रामा कांबळे | सदस्य | 7507652424 |
| 7 | प्रयाग तानाजी कांबळे | सदस्य | 8605236287 |
| 8 | अनुसया रामदास भोजने | सदस्य | 9325351879 |
| 9 | माधुरी चंद्रकांत भोकरे | सदस्य | 9767831992 |
| 10 | मोनिका अशोक अंधारे | सदस्य | 9834912782 |
| 11 | महेश भरत जगताप | ग्रामपंचायत अधिकारी | 9923903375 |
| 12 | गुंडू बबुवान भोकरे | पाणी पुरवठा | 8805062479 |
| 13 | महालींग गुरूलिंग स्वामी | ग्रा.पं. शिपाई | 8888781406 |
| 14 | अमर शिवदर्शन उबाळे | ऑपरेटर | 8421837262 |
📝 नागरिकांसाठी तक्रार / अभिप्राय
नागरिकांसाठी तक्रारी व अभिप्राय ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपल्या समस्येची माहिती देऊन ग्रामपंचायतीस सहकार्य करा.
➡️ तक्रार / अभिप्राय नोंदवाग्रामपंचायत उपक्रम :

स्वच्छता आणि आरोग्य
उटी (बु.) गावाने राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवून 'स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण गाव' म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

विकास आणि पायाभूत सुविधा
अत्याधुनिक सुविधा, १००% रस्ते आणि तंत्रज्ञानाचा वापर करून 'स्मार्ट ग्राम' बनले आहे.

पर्यावरण आणि ऊर्जा
या विभागात उटी (बु.) ने 'माझी वसुंधरा' अभियानात यश मिळवत, पर्यावरणाचे रक्षण आणि सौर ऊर्जेचा वापर यावर विशेष लक्ष दिले आहे.

शिक्षण आणि सामाजिक कल्याण
ग्रामस्थांना ज्ञान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.

स्वच्छता आणि आरोग्य
उटी (बु.) गावाने राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवून 'स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण गाव' म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
| पुरस्कारांची मालिका | राष्ट्रीय स्तरावर 'निर्मल ग्राम पुरस्कार' प्राप्त. हागणदारी मुक्त गाव म्हणून ओळख. |
| सर्वांगीण स्वच्छता | संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सलग ५ वर्षे प्रथम क्रमांक. वसंतराव नाईक पुरस्कार (२०१७-१८) प्राप्त. |
| पायाभूत सुविधा | १००% घरांना शोष खड्डे आणि गावाअंतर्गत ४.३ KM बंदिस्त नाली बांधकाम पूर्ण. |
| कचरा व्यवस्थापन | कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक घंटागाडीचा वापर. |
| शुद्ध पाणी | १००% घरांना दररोज नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा आणि सार्वजनिक ठिकाणी मोफत RO फिल्टर पाण्याची व्यवस्था. |
विकास आणि पायाभूत सुविधा
उटी (बु.) गाव अत्याधुनिक सुविधा, १००% रस्ते आणि तंत्रज्ञानाचा वापर करून 'स्मार्ट ग्राम' बनले आहे.
| स्मार्ट ग्राम | जिल्हा स्मार्ट ग्राम आणि तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार (२०२०-२१). नेशनल पंचायत अवार्ड (२०२३-२४) तालुका जिल्हा विभागात प्रथम. |
| पायाभूत सुविधा | १००% पक्के रस्ते आणि सुसज्ज अशी दफन भूमी. |
| सुरक्षितता आणि तंत्रज्ञान | संपूर्ण गाव CCTV द्वारे निगराणीखाली (सुरक्षित गाव). इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध. |
| प्रशासन आणि सेवा | पेपरलेस ग्रामपंचायत २०२३-२४ (२०२०-२१ मध्येही पुरस्कार). १००% लाईट बील ग्रा.पं. सेवा केंद्रातून घेतली जातात. |
| आर्थिक विकास | सुसज्ज असे व्यापार संकुलन (दुकान गाळे) विकसित. MGNREGA अंतर्गत मनुष्यदिन निर्मिती व फळबाग लागवडमध्ये तालुक्यातुन सलग २ वर्षे १/२ रा क्रमांक. |


पर्यावरण आणि ऊर्जा
या विभागात उटी (बु.) ने 'माझी वसुंधरा' अभियानात यश मिळवत, पर्यावरणाचे रक्षण आणि सौर ऊर्जेचा वापर यावर विशेष लक्ष दिले आहे.
| पर्यावरण पुरस्कार | पर्यावरण विकासरत्न (राज्य स्तर) आणि पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना पुरस्कार प्राप्त. माजी वसुंधरा (२०२३-२४) विभागात तृतीय. |
| वृक्षारोपण | लोकसंख्येच्या चार पट वृक्ष लागवड केली, ज्यांना ट्रिगार्ड आणि ठिबक सिंचनची व्यवस्था आहे. दोन ठिकाणी मियावाकी वृक्ष लागवड प्रकल्प. |
| सौर ऊर्जा वापर | सर्व सार्वजनिक इमारतींवर सोलर लाईट आणि संपूर्ण गावात सोलर पथ दिवे बसवले. |
| इको-फ्रेंडली सुविधा | गावातील विविध चौकांमध्ये गरम पाण्याकरिता सोलर वॉटर हिटर उपलब्ध. |
शिक्षण आणि सामाजिक कल्याण
ग्रामस्थांना ज्ञान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.
| शैक्षणिक सुविधा | जि. प. शाळेत आत्याधुनिक संगणक कक्ष आणि CCTV द्वारे निगराणी. |
| ज्ञान केंद्र | सुसज्ज आसे वाचनालय व स्पर्धा परीक्षा तयारी अभ्यासिका (स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान). |
| मोफत सेवा | महिलांसाठी मोफत पिठाची गिरणीची सुविधा. |
| सामाजिक सुरक्षा | इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ राज्य सेवा योजना या सर्व योजनांमध्ये १००% लाभार्थ्यांना सामावून घेतले. |


मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान :

'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' हा महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे, ज्यामध्ये कामगिरीनुसार प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे हे उद्दिष्ट आहे. या अभियानांतर्गत, ग्रामपंचायतींना सुशासन, सक्षम पंचायत, जलसमृद्धी आणि हरित आणि स्वच्छतेसारख्या सात घटकांवर आधारित कामगिरीसाठी पुरस्कार दिले जातात.
ग्रामपंचायत उटी (बु.) गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रामस्तरीय समिती स्थापना केली आहे पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..👇
ISO प्रमाणन 9001:2015
- ग्रामपंचायतीतर्फे उत्कृष्ट कार्य, पारदर्शक प्रशासन व गुणवत्तापूर्ण सेवा यासाठी ग्रामपंचायत उटी बु तसेच दोन्ही अंगणवाडी केंद्रांना ISO नामांकन प्राप्त झाले आहे. हा सन्मान ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेचे आणि नागरिकाभिमुख उपक्रमांचे प्रतीक आहे. 🙌
- ग्रामपंचायत उटी बु — गुणवत्तापूर्ण, स्वच्छ व प्रगत प्रशासनाचे आदर्श उदाहरण. 🌞



“आमचा गाव आमचा विकास”
ग्रामपंचायत विकास आराखडा
वार्षिक आराखडा सन २०२६–२७
ग्रामपंचायत विकास आराखडा
दस्तऐवज क्र. ०१वार्षिक आराखडा
दस्तऐवज क्र. ०२आराखडा दस्तऐवज
दस्तऐवज क्र. ०३आराखडा दस्तऐवज
दस्तऐवज क्र. ०४आराखडा दस्तऐवज
दस्तऐवज क्र. ०५आराखडा दस्तऐवज
दस्तऐवज क्र. ०६आराखडा दस्तऐवज
दस्तऐवज क्र. ०७आराखडा दस्तऐवज
दस्तऐवज क्र. ०८आराखडा दस्तऐवज
दस्तऐवज क्र. ०९आराखडा दस्तऐवज
दस्तऐवज क्र. १०आराखडा दस्तऐवज
दस्तऐवज क्र. ११आराखडा दस्तऐवज
दस्तऐवज क्र. १२महिला मदत व जनहितार्थ हेल्पलाईन माहिती
📞 14490 वर कशासाठी कॉल करू शकतात?
या नंबरवर महिलांना खालील बाबींमध्ये मदत मिळते:
- घरगुती हिंसा (Domestic Violence)
- छेडछाड / अत्याचार
- सायबर छळ
- कायदेशीर मार्गदर्शन
- समुपदेशन (Counselling)
- तातडीची मदत आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क
📢 जनहितार्थ सूचना
महत्वाचे हेल्पलाईन नंबर – आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर. ग्रामस्थांच्या माहितीसाठी कळविण्यात येते की शासनाने नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी खालील हेल्पलाईन सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
🚭 14499 – तंबाखू मुक्ती हेल्पलाईन
तंबाखू / गुटखा / सिगारेट सोडण्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशन.
👩🦰 14490 – महिलांसाठी मदत हेल्पलाईन
महिलांवरील अत्याचार, छळ किंवा अन्य अडचणीसाठी त्वरित मदत.
या सेवांचा गरज पडल्यास जरूर उपयोग करावा व इतरांनाही माहिती द्यावी.
🙏 आपले आरोग्य व सुरक्षितता – आपली जबाबदारी
आमच्या सेवा
विविध दाखले
ग्रामपंचायत मधून देण्यात येणारे विविध दाखले
ग्रा.प.शी संबंधित नसलेल्या व लोकांसाठी उपयोगी सेवा
बँकिंग सुविधा, रिचार्ज,रेल्वे/बस आरक्षण,पॅनकार्ड ,आधारकार्ड,विज बील भरणा,ई.
ग्रामपंचायतीचा जमा - खर्च
ग्रामपंचायतीचा जमा - खर्च.
तहसील कार्यालयाशी संबंधित सेवा
उत्पन्नाचा दाखला,अधिवास प्रमाणपत्र,जातीचा दाखला ई.
स्वयंघोषणापत्रे
स्वयंघोषणापत्रे व त्यातील माहिती
-: सरकारी सेवा ची यादी :-

लाभार्थी रजिस्टर
सध्या सुरु असलेल्या योजना

जिल्हा परिषद लातुर
जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या जिल्हा परिषदेने केला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे

जिल्हाधिकारी कार्यालय ,लातुर
नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर. छायाचित्र उपलब्ध नाही, अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, 02382-224201

विकसित भारत-जी राम जी
विकसित भारत-जी राम जी योजना (अधिकृत नाव: विकसित भारत – रोजगार आणि उपजीविका मिशन (ग्रामीण) हमी कायदा, २०२५ किंवा VB-G RAM G) ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक नवीन ग्रामीण रोजगार योजना आहे. ही योजना जुन्या मनरेगा (MGNREGA) योजनेची जागा घेते, जी १ जुलै २०२६ पासून देशभरात लागू झाली आहे. 'विकसित भारत @२०४७' अंतर्गत ग्रामीण भागाचा कायापालट करणे आणि ग्रामीण कुटुंबांना रोजगाराची कायदेशीर हमी देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे




अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा..
ग्रामपंचायत कार्यालय उटी (बु.), ता. औसा, जि. लातूर - 413520
Email ID : utibk33@gmail.com
सरपंच : +91 8975268881
उपसरपंच : +91 9921401269
ग्रामपंचायत अधिकारी : +91 9923903375


